Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी दररोजन या संदर्भातील लोकांची चौकशी करत आहेत. तसेच दिवसागणिक नवे खुलासे सुद्धा होताना दिसून येत आहेत. याच दरम्यान आता सुशांतच्या वडिलांचे वकील केके सिंह यांनी शवविच्छेदन रिपोर्ट्स संदर्भात प्रश्न उपस्थितीत केला आहे. केके सिंह यांनी असे म्हटले आहे की, सुशांत याचा मृत्यूची वेळ काय होती ही महत्वाची माहिती आहे. परंतु शवविच्छेदन रिपोर्ट मध्ये त्याचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. त्याचसोबत पुढे केके सिंह यांनी असे ही स्पष्ट केले की, आत्महत्या केल्यानंतर वेळेची माहिती मिळाल्यास त्याला फासावर लटकवण्यात आले का की त्याने फाशी लावून आत्महत्या केली याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
सुशांत याने आत्महत्या केल्यानंतर त्याचे मृत शरीर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. तर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आतापर्यंत 30हून अधिक जणांचीी चौकशी करण्यात आली होती. तसेच हे प्रकरण आता सीबीआयकडे गेले असून ईडीने सुद्धा रिया चक्रवर्तीसह तिच्या परिवाराची सुद्धा चौकशी केली आहे. तर काल सुशांतच्या मृत्यू संदर्भातील एक अपडेट येत त्यात असे म्हटले होते की, अभिनेत्री व कलाकार अंकिता लोखंडे राहत असलेल्या फ्लॅटचा EMI हा सुशांत याच्या बँक खात्यातून जात होता. तसेच तो फ्लॅट सुशांत याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली.(Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत नाही तर अंकिता लोखंडे स्वत: च भरते आपल्या घराचे EMI; सोशल मिडियावर शेअर केला 'हा' पुरावा)
The post mortem report that I have seen doesn't mention the time of death which is a crucial detail. Whether he was hanged after being killed or he died by hanging can be cleared with the time of death: Vikas Singh, lawyer of #SushantSinghRajput's father pic.twitter.com/XBoMyJb7ih
— ANI (@ANI) August 15, 2020
दरम्यान, सुशांत याच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्ती हिने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर अद्याप कोर्टात सुनावणी होणे बाकी आहे. याचिकेत रिया हिने असे म्हटले आहे की, हे प्रकरण मुंबईत ट्रान्सफर करुन बिहार पोलिसांच्या कारवाईवर बंदी घालण्यात यावी. या प्रकरणी विकार सिंह हे सुशांतच्या वडिलांच्या बाजूने लढत आहेत.