सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे घेताना दिसत आहे. सुशांतच्या आर्थिक व्यवहारांबाबत तपास करणा-या एका अधिका-याने अलीकडे एक नवीन खुलासा केला आहे. ज्यात सुशांत आपल्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्या घराचा देखील EMI भरत होता. असे सांगितले आहे. ही बातमी सोशल मिडियावर वा-यासारखी पसरली. त्यानंतर अंकिता लोखंडे हिने या चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठी यासंदर्भातील एक महत्त्वाचा पुरावा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
हा पुरावा म्हणजे अंकिताच्या घराची कागदपत्रे, EMI आणि बँक अकाउंट्स डिटेल्स असलेल्या कागदपत्रांचा फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. #GlobalPrayers4SSR: सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 15 ऑगस्टला ग्लोबल प्रेअर्सचे आयोजन; अंकिता लोखंडे हिने पोस्ट शेअर करुन चाहत्यांना सहभागी होण्याचे केले आवाहन
या फोटोंखाली "येथे मी पारदर्शकता दाखवून माझ्याबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देते. हे माझ्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन आणि माझे बँक स्टेटमेंट आहे, ज्यात प्रत्येक महिन्यात माझे घराचे EMI कट होत आहे. याबाबत मला आखी जास्त बोलायचे नाही." असे अंकिताने म्हटले आहे.
या फोटोवर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति ने तिच्यावर विश्वास दाखवत सांगितले की, "तू एक स्वतंत्र महिला आहेस आणि मला तुझ्यावर गर्व आहे.!"