#GlobalPrayers4SSR: सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 15 ऑगस्टला ग्लोबल प्रेअर्सचे आयोजन; अंकिता लोखंडे हिने पोस्ट शेअर करुन चाहत्यांना सहभागी होण्याचे केले आवाहन
Sushant Singh Rajput Global Prayer (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला आज दोन महिने पूर्ण झाले तरीही अजून या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. यामुळे सर्वच स्तरातून हा तपास CBI कडे देण्यात यावा अशी मागणी होत आहे. बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार गमावल्याचे दु:ख अजूनही त्याचे चाहते, त्याचे कुटूंबिय पचवू शकलेले नाही. यामुळे सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्याच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी उद्या म्हणजे 15 ऑगस्ट निमित्त संपूर्ण देशभरातून प्रार्थना करण्यात येणार आहे. लोकांनी या कॅम्पेनमध्ये सहभागी व्हावे यासाठी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून खास अपील केले आहे.

उद्या सकाळी 10 वाजता (स्थानिक वेळेनुसार) GlobalPrayers4SSR हा कार्यक्रम होणार आहे. या संदर्भात पोस्ट शेअर करुन त्याखील अंकिता लोखंडे हिने एक भावूक संदेश दिला आहे.

हेदेखील वाचा- CBI Inquiry for Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत च्या निधनाला आज 2 महिने पूर्ण; अंकिता लोखंडे, वरुण धवन सह या सेलिब्रिटींनी केला #CBIForSSR कॅम्पेनला सपोर्ट

'दोन महिने झाले सुशांत... मला खात्री तू जिथे कुठे असशील तिथे खूश असशील.' असे अंकिताने या पोस्टखाली म्हटले आहे. सर्वांनी या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही तिने केले आहे.

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति ने देखील आपल्या सोशल अकाऊंटवरून या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.