Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे WhatsApp Chats लीक, सोशल मीडियात ट्रोल झाले दिग्दर्शक
महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येप्रकरणी आता सीबीआयचे पथक नुकतेच मुंबईत दाखल झाले आहे. याच दरम्यान 8 जून रोजी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅट्स लीक झाले असून याची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. चॅट व्हायरल झाल्यानंतर युजर्सकडून महेश भट्ट यांना खुप ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, यांच्यासारखा व्यक्ती इज्जतीच्या लायकीचा नाही आहे.

चॅटमधून असे ही दिसून येते की, या दोघांमधील संवाद हा त्या दिवसाचा आहे ज्या दिवशी रिया हिने तिचा बॉयफ्रेंड सुशांत याचे घर सोडले होते. व्हॉट्सअॅपवरच्या चॅटवरुन अशी गोष्ट सुद्धा कळते की, रिया हिचे वडील सुशांत सोबतच्या नात्यावरुन नाखुश होते. तर भट्ट यांनी तिला त्याच्यापासून दूर जाण्याचा सल्ला दिला होता. युजर्सने असा आरोप लावला आहे की, महेश भट्टच होते ज्यांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या तणावाबद्दल त्यांनीच प्रथम म्हटले होते. यापूर्वी सुद्धा परवीन बॉबी यांच्या मानसिक स्वास्थ बद्दल ही त्यांनी विधान केले होते.(Sushant Singh Rajput Death Probe: रिया चक्रवर्ती मुंबई पोलिस, ED प्रमाणेच CBI चौकशीला देखील सामोरी जाईल: वकील सतिश मानशिंदे)

एका युजर्सने ट्वीट करत असे म्हटले की, परवीन बॉबी तणावात होती. दिव्या भारती सुद्धा डिप्रेशन मध्ये होत्या. जिया खान आणि सुशांत सुद्धा तणावात होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. हॅशटॅग महेश भट्ट, षड्यंत्र लपवण्यासाठी सर्वांवर एकच टॅग लावू नका की ते डिप्रेशन मध्ये होते आणि मानसिक त्रासात होते.

अन्य एका युजर्सने म्हटले, हा महेश भट्ट स्वत: पागल असून दुसऱ्यांना तणावात असल्याचे म्हणतो. परवीन बॉबी यांच्याबद्दल सुद्धा असेच वक्तव्य केले होते. त्यानंतर यांनी सुशांत सोबत सुद्धा अशा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. हॅशटॅगसुशांत सिंह राजपूत, हॅशटॅगमहेशभट्ट, हॅशटॅगसीबीआय, हॅशटॅगसीबीआईफॉरएसएसआर.

पुढे सुद्धा एकाने म्हटले की, हॅशटॅगमहेशभट्ट, वरिष्ठ नागरिकांची काळजी घ्यायला हवी आणि त्यांची इज्जत सु्द्धा करावी. परंतु महेश भट्ट सारख्या नागरिकांबद्दल तुमचे काय मत? तरुण पिढीसाठी हे लज्जास्पद आहे.(Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत च्या प्रार्थना सभेत जगभरातून 10 लाखांहून अधिक लोक झाले सामील, बहिण श्वेता सिंह किर्ति ने ट्विटरवर दिली माहिती)

गुरुवारी रिपोर्टमध्ये या गोष्टीचा सुद्धा खुलासा करण्यात आला की, सुशांतच्या शवविच्छेदनावेळी रिया कुपर रुग्णालयातच होती. लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यावेळी महेश भट्ट सुद्धा तेथेच असतील. एकाने म्हटले की, रुग्णालयाच्या आतमध्ये रिया हिला जाण्यासाठी परवानगी दिलीच कोणी? ती तेथे 45 मिनिटांपर्यंत होती. या दरम्यान ती काय करत होती? गरजेचे पुरावे नष्ट करत असेल... हॅशटॅगमहेशभट्ट हॅशटॅगरियाताई.