Sushant Singh Rajput And Shweta Singh Kirti (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याला न्याय मिळवून देण्यासाठी जगभरातील तमाम चाहते एकवटले आहेत. त्याच्या कुटूंबियांनी सुरु केलेल्या या लढ्याला सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 15 ऑगस्टला ग्लोबल प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति (Shweta Singh Kirti) ने याबाबत सोशल मिडियावर माहिती दिली होती. त्या सभेला जगभरातून 10 लाखांहून अधिक लोकांनी पाठिंबा दिल्याची माहिती श्वेता नुकतीच सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.

सुशांतसाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रार्थना सभेला लोकांचा हा पाठिंबा पाहून श्वेता भारावून गेली असून तिने सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले आहे. "या प्रार्थनासभेत सामील झालेल्या लोकांची संख्या पाहता ही एक आध्यात्मिक क्रांति आहे आणि ही जगभरात पसरत आहे. आपल्या या प्रार्थनेचे उत्तर जरूर मिळेल" असं तिने या पोस्टखाली म्हटले आहे.

हेदेखील वाचा- #GlobalPrayers4SSR: सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 15 ऑगस्टला ग्लोबल प्रेअर्सचे आयोजन; अंकिता लोखंडे हिने पोस्ट शेअर करुन चाहत्यांना सहभागी होण्याचे केले आवाहन

अलीकडेच सुशांतला कॅलिफोर्निया राज्य विधानसभेकडून (California State Assembly) सन्मानित करण्यात आलं आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने सुशांत तर्फे हा पुरस्कार स्वीकारला आहे. या पुरस्कारामुळे सुशांतच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.