Surgical Strike 2: भारतीय वायूसेनेचे बॉलिवूड कलाकारांकडून कौतुक (Photo Credits-Facebook)

Surgical Strike 2: जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या 12 दिवसात भारताने पाकिस्तान (Pakistan) विरोधात मोठी कारवाई केली आहे. तसेच भारतीय वायूसेनेचे मिराज 2000 हे लढाऊ विमान पहाटे 3.30 च्या सुमारास पाकव्याप्त काश्मिराच घुसुन जैश-ए-मोहम्मदच्या तळावर 1000 किग्रॅ वजनाच्या बॉम्बचे हल्ले केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची आता बोलती बंद झाल्याचे दिसून येत आहे.

वायूसेनेच्या या कार्यकिर्दिचे पडसाद बॉलिवूड कलाकारांमध्ये उमटले असून त्यांनी सेनेचे भरभरुन कौतुक केले आहे. तसेच सोशल मीडियावर पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा नेटकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. तर बॉलिवूड कलाकारांकडून शहीद जवानांना परिवाराला आर्थिक मदत ही देऊ केली. (हेही वाचा-Pulwama Terror Attack: टोटल धमाल सिनेमाच्या टीमची शहीद जवानांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत)

मात्र आता वायूसेनेची पाकिस्तावरील ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे कलाकारांकडून म्हटले आहे. तर ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्याचसोबत पुलवामा दहशतवादी हल्ल्याला वायूसेनेने प्रतिउत्तर दिले असल्याने त्यांचे ही कौतुक केले जात आहे.