Total Dhamaal Movie Team (Photo Credit: Twitter)

Pulwama Terror Attack: जम्मू काश्मीर येथील पुलवामा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उसळलेल्या संतापाच्या लाटेसोबतच शहीद झालेल्या जवानांच्या मदतीसाठी देखील अनेकजण पुढे येत आहेत. सामान्यांपासून ते अगदी बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वजण मदतीसाठी पुढे आले आहेत. 'टोटल धमाल' (Total Dhamaal) सिनेमाच्या टीमनेही शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी निधी गोळा केला आहे. (शहीद जवानांच्या कुटुंबांना अक्षय कुमारची 5 कोटी मदत; बॉलीवूडच्या या कलाकारांनी दिला मदतीचा हात)

अजय देवगण, अरशद वार्सी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, जॉनी लिव्हर, जॅकी श्रॉफ या कलाकारांच्या अभिनयाने हा सिनेमा रंगला आहे. यातील अनेकांनी ट्विट करत शहीदांच्या कुटुंबियांना साहाय्य दर्शवले आहे. इतकंच नाही तर या टीमने तब्बल 50 लाखांचा निधी गोळा करून शहीदांच्या कुटुंबियांना दान देणार असल्याचे सांगितले आहे.

यापूर्वी 'उरी' सिनेमाच्या टीमने शहीदांच्या कुटुंबियांसाठी निधी गोळा केला होता. त्यानंतर अक्षय कुमार, अमिताभ बच्चन या कलाकारांनी तर गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन या खेळाडूंनी शहीदांच्या कुटुंबांना मदत जाहीर केली आहे.