Sanjay Dutt Meets Nitin Gakdari in Nagpur (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची नागपूरात असलेल्या निवासस्थानी भेट घेतली आहे. शनिवारी संजय दत्त याने त्यांची भेट घेतली होती पण त्याबद्दल माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, संजय दत्त याने नेमक्या कोणत्या कारणामुळे नितीन गडकरी यांची का भेट घेतली किंवा त्या दोघांमध्ये काय बातचीत झाली याबद्दल अद्याप स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. शनिवारी संजय दत्त नागपूरात होता. त्याचवेळी तो नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी गेला असता त्याने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.

नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर संजय दत्त महाराष्ट्रातील उर्जा मंत्री नितीन राउत यांच्या निवासस्थानी पोहचला. त्याने तेथे नितीन राउत यांचा मुलगा, त्याची पत्नी यांची सुद्धा भेट घेतली. नितीन राउत यांच्या मुलाचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांनी रिसेप्शन रद्द केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राउत यांच्या या निर्णयाचे कौतुक केले होते.(भाजप खासदार व अभिनेत्री Hema Malini यांचा अजब दावा; Covid-19 ला दूर ठेवण्यासाठी घरी रोज करा हवन Watch Video)

Tweet:

दरम्यान, संजय दत्त नागपूरात काही खासगी कारणास्तव गेला होता. शनिवारी रात्रीच तो मुंबईत परतला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता संजय दुबे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. संजय दुबे यांचा मुलगा गौरव याचा संजय सोबत जवळचा संबंध आहे. याआधी सुद्धा संजय दत्त 2019 मध्ये नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी विधानसभा निवडणूका पार पडणार होत्या. अशातच संजय दत्त भाजपात एन्ट्री करणार अशी चर्चा होती. परंतु त्याने स्पष्टीकरण देत मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचे सांगितले.