अभिनेता रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर; विशागन वनानगामुडी याच्यासोबत थाटणार संसार
Soundarya Rajinikanth | (Photo courtesy: archived, edited images)

दक्षिण सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी सौंदर्या पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. हे तिचे दुसरे लग्न आहे. विशेष असे की, तिच्या होणाऱ्या पतीचेही हे दुसरे लग्न आहे. रजनीकांत यांना एकणू दोन मुली आहेत.  एश्वर्या (Aishwarya) आणि सौंदर्या (Soundarya) अशी त्यांची नावे. त्यापैकी सौंदर्या ही अभिनेता आणि उद्योगपती विशागन वनानगामुडी (Vishagan Vanangamudi) याच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. हा विवाह सोहाळा चेन्नई येथे पार पडेल, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. विशनगन आणि सौंदर्या यांच्यात नुकतीच Engagement Ceremonies पार पडली होती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा विवाह येत्या 11 फेब्रुवारीला पार पडणार आहे. मात्र, विवाहाचे विधी 9 फेब्रुवारीपासूनच सुरु होतील. विवाहापूर्वी रजनीकत यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी एक पूजाविधी पार पडेल. हा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, विशागन याचेही हे दुसरे लग्न आहे. एका वृत्तपत्राची संपादिका कनिखा कुमारन आणि विशानग हे यापूर्वी विवाहबद्ध झाले होते. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टीकू शकले नाही. अल्पावधीतच दोघे विभक्त झाले. त्यांनी घटस्फोट घेतला. दुसऱ्या बाजूला सौंदर्या हिनेही 2010मध्ये उद्योजक अश्विन याच्यासोबत विवाह केला होता. मात्र, त्यांचाही विवाह फार काळ टीकला नाही. सौंदर्या आणि अश्विन यांना पाच वर्षांचा एक मुलगाही आहे. मात्र, गेल्या वर्षी घटस्फोट घेत दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. सांगितले जाते की, आपल्या मुलीचा संसार वाचविण्यासाठी रजनीकांत यांनी अनेक प्रयत्न केले. पण, त्यांना त्यात यश आले नाही. (हेही वाचा, प्रतिक-सान्या यांचा विवाहसोहळा संपन्न)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या आणि विशागन वनानगामुडी या दोघांच्या कुटुंबीयांनी विवाहाची जोरदार तयारीही केली आहे. दोघांच्या कुटुंबात सध्या लगीनघाई सुरु आहे. सौदर्या हिने 'व्हिआयपी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, 'बाबा', 'शविाजी', यांसारख्या चित्रपटांच्या ग्राफिक डिजाईनमध्येही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. रजनीकांत यांच्या घरी 9 फेब्रुवारीला संगीत आणि मेहंदी कार्यक्रमास सुरुवात होईल.