
अभिनेता प्रतिक बब्बर (Prateik Babbar) अलिकडेच गर्लफ्रेंड सान्या सागर (Sanya Sagar) हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. हा पारंपारिक विवाहसोहळा लखनऊत (Lucknow) पार पडला आणि या आनंदी क्षणांचा पहिला फोटो सोशल मीडियावर धडकला आहे. जानेवारी 2018 मध्ये प्रतिक-सान्याचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर वर्षभराने दोघेही विवाहबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या हळदी आणि मेंहदी सोहळ्यातील फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
या खास प्रसंगी सान्या आणि प्रतिक दोघेही अतिशय सुरेख दिसत आहेत. या विवाहसोहळ्यात बसपा नेत्या मायावती (Mayawati) यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळी सहभागी होण्याची शक्यता होती.
प्रतिक आणि सान्या यांची 8 वर्षांपासून मैत्री आहे. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी मिळून वर्षाची धमाकेदार आणि आनंदी सुरुवात केली. (प्रतिक बब्बर अडकणार लग्नबंधनात; पाहा कोण आहे राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची होणारी सून)



प्रतिकने 'जाने तू या जाने ना,' 'धोबीघाट', 'एक दिवाना था,' आणि 'बागी 3' या सिनेमात आपल्या अभिनयाची चुकूण दाखवली आहे. तर सान्याने अनेक संगीत व्हिडिओज, शॉर्ट फिल्म्स आणि फॅशन फिल्म्सची निर्मिती-दिग्दर्शन केले आहे.