जोपर्यंत शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचत नाही, तोपर्यंत मदत थांबणार नाही - सोनु सूद
Sonu Sood (PC - Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) देशातील विविध राज्यात लाखो मजूर अडकून पडले आहेत. हाताला काम नसल्याने या मजूरांनी शेकडो किमीची पायपीट करत आपल्या मूळ गावाचा रस्ता धरला आहे. सरकारकडून या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे. या मजूरांच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) धावून आला आहे. सोनू सूदने लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.

जोपर्यंत शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचत नाही, तो पर्यंत मी शांत बसणार नाही, असा दृढ निश्चय सोनू सूदने केला आहे. सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन मजूरांसाठी गाड्यांची सोय केली आहे. यासाठी सोनू सूद यांनी कोणाकडून पैसे आकारले नाहीत. या सर्व मजूरांना मोफत आपल्या गावी सोडण्याचं काम सोनूने हाती घेतलं आहे.

सोनू सूद यांच्या मदतीमुळे महाराष्ट्र सरकारवर पडणारा भार काही प्रमाणात हलका झाला आहे. याअगोदर सोनू सूद ने 1 हजार 500 PPE किट्सची मदत केली होती. तसेच सोनूने आपले अलिशान हॉटेल आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुले केले होते. याशिवाय सोनूने स्थलांकरित मजुरांच्या प्रवासाचीचं नाही तर त्यांच्या जेवणाचीदेखील सोय केली आहे. सोनू सूद ने यापूर्वी कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी प्लास्टिक फाईलपासून मास्क कशा पद्धतीने बनवला जातो, याचा व्हिडिओ शेअर केला होता. (हेही वाचा - अनोख्या हेअरस्टाईलमुळे प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर ट्रोल; पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

Stay home stay safe 😷

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on

कोरोना विरोधातील लढाईसाठी आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यातील अनेकांना पंतप्रधान केअर फंडला आर्थिक स्वरुपाची मदत केली आहे. तसेच अनेकांनी गरजूंना अन्नधान्य आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. सोनू सूदच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.