Bihar NDA | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने विधानसभा निवडणूक 2020 साठी जागावाटप जाहीर केले आहे. मुख्यमंत्री आणि बिहार एनडीएचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मंगळवारी ही घोषणा केली. एनडीएने एकूण 243 मतदारसंघांसाठी हे जागावाटप जाहीर केले. एनडीएमध्ये संयुक्त जनता दल (JDU) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) दोन पक्ष प्रमुख आहेत. जनता दल युनायटेड (JDU) 115 जागा लढवणार आहे. तर भारतीय जनता पक्ष 112 जागा लढवणार आहे. उर्वरीत जाका मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. आज (मंगळवार, 6 ऑक्टोबर) सकाळी भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवास्थानी गेले होते. भाजपच्या नेत्यांमध्ये बिहार भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडनवीस, बिहार प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि प्रदेश भाजप अध्यक्ष संजय जायसवाल उपस्थित होते. भाजप नेते आणि नितीश कुमार यांच्यात जागावाटपावरुन सुमारे अडीच तास चर्चा केली. त्यानंतर जागावाटपाचा निर्णय जाहीर करण्यात आला.

एनडीए घटक पक्ष लढवणाऱ्या जागांची संख्या

  • जनता दल युनाडयेड (JDU) - 115
  • भारतीय जनता पक्ष (वरज) - 112
  • व्हीआयपी (VIP)- 9
  • हिंदुस्तानी आवाम मोर्चा ( HAM)- 7

दरम्यान, जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) पक्षाला देण्यात येणाऱ्या 7 जागा जदयुच्या कोट्यातून देण्यात येणार आहेत. तर मुकेश सहनी यांच्या विकासशील इंसान पार्टी (VIP) पक्षाला देण्यात आलेल्या 9 जागा भाजपच्या कोट्यातून देण्यात येणार आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: राजद, काँग्रेस महाआघाडीचे जागावाटप जाहीर)

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल (Sanjay Saisawal) यांनी चिराग पासवान (Chirag Paswan) यांना स्पष्ट संदेश दित सांगितले की, ते जर नीतीश कुमार यांचे नेतृत्व माणणार नसतील तर त्यांनी बिहार एनडीएतूनही बाहेर पडावे लागेल.