Bihar Assembly Election 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) साठी महागठबंधन (Mahagathbandhan) म्हणजेच महाविकासआघाडीचे जागावटप (Seat Sharing) जाहीर झाले. निवडणुकीच्या रणधुमाळीत जागावाटपाच्या रुपात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर घटक पक्षांच्या रुपात महागठबंदनने एक पाऊल पुढे टाकले आहे. उत्सुकता आहे जागावाटपासाठी एनडीए (NDA) कोणता मुहूर्त पाहणार. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दल, भाजप, लोकजनशक्ती पार्टी (LJP) आणि इतर पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन तणाव कायम आहे. प्राप्त माहितीनुसार, एनडीए जागावाटपाची घोषणा आज (रविवार, 10 ऑक्टोबर) करण्याची शक्यता आहे.

एनडीए आज करणार घोषणा?

बिहार विधानसभा निवडणूक 2020 एनडीए आज जागावाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. आजच्या जागावाटपात नीतीश कुमार यांचा जदयु बिग ब्रदर राहणार की वेगळ्य भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता आहे. लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी भूमिका स्पष्ट केल्यास एनडीएचे जागावाटप लवकर होऊ शकते.त्यामुळे लोजपा आणि एनडीएतील इतर छोट्या घटक पक्षांची भूमिका काय याबाबत एनडीएचे जागावाटप अवलंबून आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: 'भाजपा'चे जवळचे आमने-सामने; बिहार विधानसभा निवडणुकीत NDA समोर नवी आव्हाने?)

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) घटक पक्ष (बिहार)

  • जनता दल युनायटेड (JDU)
  • भारतीय जनता पक्ष (BJP)
  • लोक जनशक्ति पार्टी (LJP)
  • हिंदुस्तान अवाम मोर्चा (हम)
  • विकासशील इनसान पार्टी (VIP)
  • इतर

महाआघाडी (महागठबंधन) घटक पक्ष (बिहार)

  • राष्ट्रीय जनता दल (RJD)
  • काँग्रेस (Congress)
  • सीपीएम-
  • सीपीआय
  • सीपीआय(माले)
  • इतर

महाआघाडी (महागटबंधन) जागावापट

 

  • राष्ट्रीय जनता दल – 144
  • काँग्रेस – 70
  • सीपीएम-04
  • सीपीआय 06
  • सीपीआय(माले) -01

दरम्यान, बिहारच्या राजकारणात जवळपास सर्वच पक्ष स्वबळ विसरुन केवळ सत्ता या एकाच उद्देशाने कार्यरत झालेले दिसतात. बिहारमध्ये आगोदरच एनडीए आणि महागठबंधन या दोन आघाड्या आगोदरच कार्यरत असताना माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी(रालोसपा)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी यूपीएची साथ सोडली आहे. त्यांनी बसपासोबत तिसरी आघाडी केली आहे. दुसऱ्या बाजूला जीतन राम मांजी यांचा हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षानेही युपीएची साथ सोडत एनडीएचा आधार घेतला आहे.