COVID-19 Scare in India: देशभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे केवळ सामान्य जनताचं नव्हे तर रुग्णालय प्रशासनही असहाय झाल्याचं दिसून येत आहे. बर्याच रुग्णालयात बेड सुविधांची तसेच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची समस्या उद्भवली आहे. याशिवाय औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मेडीकलमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत.
सद्यस्थिती लक्षात घेऊन अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत, उपचारांदरम्यान लोकांना निर्माण होणारी समस्या कमी करण्याच्या उद्देशाने तिने लोकांना आपल्या गरजा शेअर करण्यास सांगितलं आहे. इंस्टाग्रामवर सोनमला टॅग करून गरजूंनी आपल्या समस्या शेअर कराव्यात, जेणेकरून त्या व्यक्तीला वेळेवर मदत मिळेल. अभिनेत्रीने आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे. (वाचा - 'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड)
सोनमने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये लोकांना मास्क घालण्याचे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच लोकांनी स्वत:च्या प्रकृतीकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करणे टाळावे. लोकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहनही तिने केलं आहे. याशिवाय कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने मदत करायला हवी, असंही सोनमने म्हटलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा आणि आलिया भट्ट यांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने माहिती शेअर करून मदतीची विनंती केली आहे.