Anjali Arora Debut Bollywood: सोशल मीडिया इन्फ्लूएंसर अंजली अरोराचंं चित्रपटसृष्टीत पाऊल, नेटकऱ्यांकडून होतेय ट्रोल
Anajali Arora PC TWITTER

Anjali Arora Debut Bollywood: काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' हे गाणं प्रसिध्द झालं होते. या गाण्यावर डान्स करणारी अंजली अरोरा सोशल मीडियाच्या व्हिडिओमुळे चर्चेत होती. अंजलीच्या चाहत्यांसाठी सुखद बातमी समोर आली आहे. ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याची चर्चा रंगली होती. नितेश तिवारी यांचा 'रामायण' या चित्रपटात ती मुख्य भुमिकेत दिसणार आहे. अंजलीच्या चाहत्यांना ही माहिती मिळताच, खुश झाले परंतु एकीकडे तीला या गोष्टीवरून ट्रोल केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली अरोरा ही सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार असल्याची माहिती दिली. रामायण चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक सिंग यांनी अंजली अरोरा चित्रपटात सीताची भुमिका करणार असल्याची माहिती दिली. एकीकडे सोशल मीडियावर अंजलीच्या चाहत्यांना आनंद झाला असून दुसरीकडे तीला या ट्रोल केलं जात आहे. बॉयकोट अंजली असा हॅशटॅग वापरून तीला ट्रोल केलं जात आहे.

अंजलीला कमी वेळात जास्त प्रसिध्दी मिळाली होती. तीच्या कच्चा बदाम डान्समुळे सोशल मीडियावर प्रसिध्दी मिळाली होती. इन्स्टाग्रामवर अंजलीचे १३ मीलियन फोलोवर्स आहेत. कच्चा बदामनंतर तीला प्रसिध्दी मिळाल्यानंतर अंजलीने सोशल मीडियाच्या मदतीने आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तिच्या व्हिडिओवर लाखो लाईक्स असतात.

ई टाईम्सला अंजलीने मुलाखत दिली होती, त्यावेळीस तीने ही बातमी दिली.तीने सांगितले की, " माझी तुलना बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केला जात असल्याचा मला आनंद आहे. दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांनी सांगितले की, तु ही भुमिका व्यवस्थित साकरशील. त्यांनी आणखी काही अभिनेत्रींना शॉर्टलिस्ट केले होते. त्यापैकी माझी निवड झाली. सीतेच्या भुमिकेसाठी त्यांनी गेल्या महिन्यात मला फायनल केलं होते.