बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने बॉडीगार्ड अतुल कांबळेसाठी मराठीतून लिहिली पोस्ट
Shraddha Kapoor (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) आपल्या बॉडीगार्डला मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बॉडीगार्डसोबतचा फोटोही शेअर केला आहे. अतुल कांबळे (Atul kamble) असं श्रद्धाच्या बॉडीगार्डचं नाव आहे. अनेक दिग्गज जेव्हा गर्दीच्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम बॉडीगार्ड करत असतात. त्यामुळे श्रद्धाची ही संपूर्ण जबाबदारी पेलणाऱ्या अतुलचे श्रध्दाने आभार मानले आहेत.

श्रद्धाने इन्स्टाग्रामवर अतुलसोबतचा फोटो पोस्ट करत मराठीतून शुभेच्छा दिल्या. या फोटोला कॅप्शन देताने श्रद्धाने म्हटलयं की, 'माझ्या आयुष्यातील महत्वाच्या आणि अप्रतिम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला नेहमी सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. अतुल, तुझ्यासारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं याला मी माझं भाग्य मानते. तुला सुख, शांती आणि तुला जे हवं ते सर्व काही लाभो!' या पोस्टवरुन श्रद्धा भावनिक झाल्याचे पाहायला मिळतं. विशेष म्हणजे श्रद्धाने टाकलेल्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी अतुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत श्रद्धाची पोस्ट लाइक केली. श्रद्धाच्या या पोस्टमुळे नकळत तिचा सामान्याबाबतचा आदर दिसून येतो.

श्रद्धा कपूरने अगदी कमी वेळेत बॉलिवुडमध्ये नाव कमावले आहे. श्रद्धाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटातदेखील काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या साहो चित्रपटात श्रद्धाने मुख्य भूमिका साकारली आहे.