सिंगापूर येथील मादाम तुसाद म्युझियम मध्ये 'शाहिद कपूर'चे Wax Statue सह Twinning (Photos)
Shahid Kapoor's Wax Figure (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) चा वॅक्स स्टॅच्यू सिंगापूरच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये (Madame Tussauds Museum) उभारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या स्टॅच्यूचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) सह सोहळ्यात उपस्थित होता. (तब्बल 16 वर्षानंतर शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या 'इश्क विश्क'चित्रपटाचा सिक्वल येणार)

शाहिदचा हा स्टॅच्यू अगदी परफेक्ट तयार करण्यात आला असून शाहिद आणि स्टॅच्यूमध्ये फरक ओळखणे अवघड आहे. शाहिद कपूरने स्टॅच्यूसोबतचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

#twinning

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

1234
Shahid Kapoor (Photo Credits: Instagram)

शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंग' (Kabir Singh) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर अलिकडेच लॉन्च झाला असून याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात शाहिद सोबत कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत असून हा सिनेमा 21 जून, 2019 रोजी प्रदर्शित होईल.