तब्बल 16 वर्षानंतर शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या 'इश्क विश्क'चित्रपटाचा सिक्वल येणार
Ishq Vishk Movie (Photo Credits-Instagram)

यंदाचे 2019 च्या वर्षात बॉलिवूड मधील काही चित्रपटांचा सिक्वल येणार असल्याने प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहीली आहे. तसेच सदक, स्टुडंट ऑफ दि इयर, हाऊसफुल्ल आणि हिंदी मीडियम या चित्रपटाचे सिक्वल यंदाच्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तत्पूर्वी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करणारा शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अमृता राव (Amrita Rao) यांचा 2003 मधील चित्रपट 'इश्क विश्क' (Ishq Vishk ) चित्रपटाचा सुद्धा सिक्वल तब्बल 16 वर्षानंतर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शाहिद ह्याची या चित्रपटातील भुमिकाच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी ठरली नव्हती तर बॉक्स ऑफिसवर सुद्धा या चित्रपटाने भरपूर कमाई केली होती.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, प्रोड्युसर रमेश तौरानी (Ramesh Taurani) यांनी 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'इश्क विश्क' चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच या चित्रपटाच्या सिक्वल बद्दल कबुली दिली असून त्याच्या कथेवर अद्याप काम सुरु असल्याचे म्हटले आहे. तसेच लहान वयातील प्रेमाच्या आधारावर याची कथा असणार असून येत्या दोन तीन महिन्यात कथा पूर्ण करुन यासाठी कलाकार आणि दिग्दर्शकांची निवड करण्यात येणार आहे.

'इश्क विश्क' या चित्रपटाचे दिग्दर्शन केन घोश यांनी 2003 मध्ये केले होते. तसेच चित्रपटाची कथा ही तरुण मुलाचे कॉलेजातील प्रेम आणि त्यानंतरच्या गोष्टी कोणत्या वळणावर जातात यामधून दाखवले आहे. तर शाहिद आणि अमृता राव यांनी विवाह, शिखर, वा! लाईफ हो तो ऐसी अशा चित्रपटांमधून एकत्र काम केले आहे.