शाहीद कपूर ७ जुलै, २०१५ ला मीरा राजपूतसोबत विवाहबद्ध झाला. (Photo Credits: Instagram)

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारत आली असून यात आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटरचा तुटवडा पडत आहे. अशा परिस्थितीत सर्व बॉलिवूड कलाकार आपापल्या परीने जमेल ती मदत करत आहेत. दरम्यान अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत-कपूर हे देखील सोशल मिडियाद्वारे गरजूंच्या मदतीला धावून आले आहेत. अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याची पत्नी मीरा कपूर (Mira Kapoor) हीने नुकतंच इन्स्टाग्रामवर लाईव्ह सेशन केलंय. मीरा कपूर हिची बहिण नूर आणि भावोजी मोहनीश वधवानी यांनी करोना काळात पिडीतांच्या मदतीसाठी आणि ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेची माहिती दिली आहे.

‘Breathe For India’ आणि ‘Billion Breath Movement’ या मोहीम सुरू केल्या आहेत. या मोहीमेत देणगी जमा करण्यासाठी अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा कपूर या दोघांनी पुढाकार घेतलाय. या मोहिमेबद्दल लोकांना सांगण्यासाठी मीरा कपूरने हे लाईव्ह सेशन केलं. इन्स्टाग्रामवर लाईव्ह असताना मीरा कपूरने या मोहिमेबद्दल सर्व माहिती दिली.हेदेखील वाचा- Akshay Kumar ने सोशल मिडियाद्वारे सांगितल्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी '4' महत्त्वाच्या कृती

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

तसंच बहिण नूर आणि भाऊजी मोहनीश वधवानी या दोघांनाही तिने या लाईव्हमध्ये आमंत्रित केलं होतं. त्यांनीही या उपक्रमाची लोकांना माहिती दिली.

लाईव्हमध्ये बोलताना मीरा कपूरने breath movement मोहिमेतून अनेक करोना पिडीतांना कशा प्रकारे मदत केली जाते, हे देखील सांगितलं. पत्नी मीरा कपूरने घेतलेल्या या निर्णयाला पाठिंबा देत अभिनेता शाहिद कपूरने तिचा हा व्हिडीओ ‘Give India’ नावाच्या पेजवर शेअर केला.

दरम्यान या संकटाच्या काळात बॉलिवूड गायक सोनू निगम (Sonu Nigam) ने आपल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबई मधील ऑक्सिजनची कमतरता भागवण्यासाठी सोनू निगम आपल्या जोडीदारासह ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करणार आहे. याची महिती सोनू निगम याने इंस्टा पोस्टद्वारे दिली आहे.