बॉलिवूड मधील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा किंग खान म्हणजेच शाहरुख (Shah Rukh Khan) याचे जगभरातून प्रंचड प्रमाणात चाहते आहेत. तर शाहरुख याचा वांद्रे पश्चिम येथे मन्नत (Mannat) नावाचा बंगला असून तो तेथे राहतो. त्यामुळे त्याच्या घराबाहेर अनेक चाहत्यांची गर्दी पहायला मिळते. तसेच शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्यापैकीच एक असा अभिनेता तो शाहरुख याच्या बंगल्याबाहेर तास तास उभे राहायचा. पण तोच अभिनेता आता बॉलिवूडचा 'राजकुमार' म्हणून ओळखला जातो.
'मेड इन चायना' या चित्रपटातून झळकलेला अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याने याबाबत अधिक खुलासा एका मुलाखती दरम्यान केला आहे. त्याने असे सांगितले की, मी शाहरुख खान याचा खुप मोठा चाहता आहे. तसेच मुंबईत जेव्हा पहिल्यांदाच येणे झाले त्यावेळी मी बरेच तास त्याच्या मन्नत बाहेर उभा होतो. त्यावेळी फक्त मला शाहरुख याला पहायचे असल्याचे राजकुमार याने सांगितले. तसेच शाहरुख याच्यासोबत माझी भेट महबूब स्टुडिओमध्ये झाली होती. त्यानंतर शाहरुखला प्रत्यक्षात पाहिल्यानंतर मला विश्वासच बसत नसल्याचे ही राजकुमारने सांगितले.(अॅसिड हल्ल्यातील पीडितांची भेट घेऊन अभिनेता शाहरुख खानने घेतला दिवाळीचा आनंद)
राजकुमारच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास त्याचा आगामी चित्रपट 'रुह अफजा' (Rooh-Afza) आणि 'तुर्रम खान' (Turram Khan) मधून झळकणार आहे. त्याचे हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. तर रुह अफजा मध्ये त्याच्यासोबत जान्हवी कपूर दिसून येणार असून तो 20 मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.