 
                                                                 दिवाळी सणाला (Diwali 2019) केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) यंदाची दिवाळी अॅसिड हल्ल्यातील पीडितांची भेट घेऊन साजरी केली आहे. शाहरुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अॅसिड हल्ल्यातील पीडितांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. काही वर्षांपूर्वी शाहरुखने ‘मीर’ या स्वयंसेवी संस्थेची (Meer Foundation) स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून अॅसिड हल्ल्यातील पीडितांचे पुर्नवसन केले जाते. तसेच त्यांना स्वावलंबी बनवले जाते.
शाहरुख खान ट्विट -
हेही वाचा - पाच चित्रपट एकत्र प्रदर्शित होऊनही 'हिरकणी'ची बॉक्स ऑफिसवर दिवाळी !
सध्या सोशल मीडियावर #ToGetHerTransformed असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ToGetHerTransformed या मोहिमेअंतर्गत अॅसिड हल्ल्यातील 120 पीडितांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शाहरुखाने पीडितांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. शाहरुख मीर फाऊंडेशनच्या माध्यमातून अॅसिड हल्यातील महिलांना नेहमी मदत करत असतो.
Shah Rukh Khan meets acid attack survivors! King of hearts indeed! ❤️@MeerFoundation #ToGetHerTransformed pic.twitter.com/uCGGbUkm18
— KingSRKsArmy (@KingSRKsArmy) October 25, 2019
सध्या शाहरुखने सध्या चित्रपटांतून ब्रेक घेतला आहे. त्याने 'झिरो' सिनेमानंतर एकाही नव्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचे चाहते त्याला मिस करणार आहेत. शाहरुखच्या या निर्णयावर फॅन्स निराश झाले असेल तरी त्याची पत्नी गौरी मात्र यावर खूप खुश आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
