Sanjay Dutt ने घेतला Corona Vaccine चा पहिला डोस; अशा शब्दांत मानले डॉक्टरांचे आभार
Sanjay Dutt (PC - Twitter)

चित्रपट कलाकार आपल्या चाहत्यांना कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी नेहमी प्रेरित करत असतात. हे कलाकार त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावर विशेष संदेश देऊन किंवा कोरोना लस घेऊन या धोकादायक साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी प्रवृत्त करत असतात. आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्तनेही (Sanjay Dutt) कोरोना लस (Corona Vaccine) घेऊन चाहत्यांना लसीकरणासाठी प्रेरित केलं आहे. संजय दत्तने स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. संजय दत्तने मंगळवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोत संजय दत्त कोविड-19 च्या लसीकरण केंद्रावर लस घेताना दिसत आहे. अभिनेत्याने हा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोसह संजय दत्तने कोरोना लस देणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानले आहेत.

संजय दत्तने आपल्या छायाचित्रासह ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'आज मी बीकेसी लसीकरण केंद्रात कोविड- 19 लसीचा पहिला डोस घेतला. अशा विलक्षण कामगिरीबद्दल डॉ. डेरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करू इच्छितो! त्यांच्याबद्दल आणि त्याच्या कठोर परिश्रमांबद्दल मला खूप प्रेम आणि आदर आहे. जय हिंद! ' संजय दत्तचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्विटवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. (वाचा - अभिजात गायक Mahesh Kale ला कोरोनाची लागण; सौम्य संसर्गामुळे Home Quarantine)

यापूर्वी संजय दत्त आपला लूक बदलल्यामुळे चर्चेत होता. नुकताच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केले होता. या फोटोत संजय दत्त नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसला होता. हा फोटो शेअर करत संजयने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'कामावर प्रचंड प्रतिभाशाली! @ Shariqahemad84 नेहमीच माझ्या सोबत राहिल्याबद्दल आणि मला नवीन रूप दिल्याबद्दल धन्यवाद!' अभिनेत्याचा हा नवा लूक चाहत्यांना खूपचं आवडला आहे.

गेल्या वर्षी संजय दत्त कर्करोगासारख्या धोकादायक आजाराच्या विळख्यात सापडला होता. 11 ऑगस्ट 2020 रोजी त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं की, "मी माझ्या वैद्यकीय उपचारासाठी एक छोटा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब आणि मित्र माझ्याबरोबर आहेत. मी माझ्या शुभचिंतकांना विनंती करतो की, त्यांनी जास्त काळजी करू नये. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांमुळे मी लवकरचं परत येईल."