सलमान खान साठी दिव्यांग चाहतीने शेअर केलं खास गिफ्ट; व्हिडिओ शेअर करत 'भाईजान' ने दिल्या शुभेच्छा!  (Watch Video)
Salman Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची (Salman Khan) क्रेझ आजही आबालवृद्धांमध्ये आहे. सिनेमा पलिकडेही त्याचा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्याच्या प्रेमापोटी अनेक खास गोष्टी त्याचे चाहते 'भाईजान' साठी करत असतात. नुकतेच सलमान खानने इंस्टाग्रामवरून एक खास व्हिडिओद्वारा स्पेशल चाहत्याचे आभार मानले आहेत. एका दिव्यांग चाहतीने सलमान खानचे स्केच काढल्याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये चाहती चक्क केवळ पायाचा वापर करून सलमान खानचं हुबेहुब स्केच रेखाटताना दिसत आहे.

सलमान खानने मानले आभार

 

View this post on Instagram

 

God bless... can’t reciprocate the love but prayers and much love !!!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

अभिनेता सलमान खान याने हा व्हिडिओ God bless... can’t reciprocate the love but prayers and much love !!! या मेसेजसह शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान समोर दमदार भाषण करणार्‍या एका चिमुकलीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यासोबतच अनेक लहान मोठ्या गोष्टी सलमान सध्या ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया हॅन्डलवरून शेअर करत आहे. सलमान खान समोर मराठमोळ्या चिमुकलीचं देशभक्तीपर भाषण (Watch Video)

सलमान खानच्या 'भारत' सिनेमाने बॉक्सऑफिसवर कमाल कामगिरी केल्यानंतर आता त्यांच्या चाहत्यांना आगामी 'दबंग 3' आणि आलिया भट्ट सोबतच्या 'इन्शाल्लाह' या सिनेमाची उत्सुकता आहे.