सलमान खान याच्या घरी आगमन झालेल्या गणपतीच्या विसर्जनावेळी सेलिब्रेशनची धूम, देसी अंदाजात डान्स करताना दिसला भाईजान (Watch Video)
सलमान खान गणपती विसर्जन (फोटो सौजन्य-Instagram)

गणेशोत्सव (Ganeshotsav) संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे. तर घरगुती गणपती पासून ते सार्वजनिक गणपतीच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तर बॉलिवूड कलाकारांच्या घरी सुद्धा गणरायाचे आगमन झाल्याने त्यांच्याकडे सुद्धा विविध कलाकारांची उपस्थिती दिसून आली. बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खान (Salman Khan) याच्या घरी सुद्धा गणरायाचे आगमन झाले. तर सलमान खान याच्या घरी दीड दिवसाचा गणपती असून त्याचे काल विसर्जन करण्यात आले.

मात्र सलमान खान याच्या घरी गणरायाला निरोप देण्यापूर्वी मोठी आरती करण्यात आली. यावेळी सलमान खान बहिण अर्पिता हिचा मुलगा अहिल याच्या सोबत गणपतीची आरती करताना दिसून आला. तसेच खान परिवारातील अन्य सदस्य सुद्धा आरतीवेळी दिसून आले.

 

View this post on Instagram

 

#salmankhan with little #ahil today #ganpatiarti at #arpitakhansharma home #viralbayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

बॉलिवूड मधील अन्य कलाकार अंगद बेदी, नेहा धूपिया यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.(Ganeshotsav 2019: रितेश देशमुख ने साकारला मातीचा बाप्पा, सोशल मीडियावर शेअर केला Making Video)

स्वरा भास्कर, डेजी शहा, वलूशा डिसूजा सुद्धा गणपती विर्जनासाठी उपस्थित होते. दरम्यान सलमान खान याचा विसर्जनावेळचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हारल झाला असून त्यामध्ये तो ढोल-ताशांच्या तालावर देसी अंदाजात डान्स करताना दिसून येत आहे.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच त्याचा दबंग 3 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सप्टेंबर महिन्यापासून हिंदी रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 13 मधून तो झळकणार आहे. त्याचसोबत अन्य काही चित्रपट सुद्धा सलमान करत असल्याचे सांगण्यात आले आहे.