Sai Tamhankar: इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत सई ताम्हणकर दिसणार 'या' नव्या प्रोजेक्ट्समध्ये
Sai Tamhankar | Facebook

अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या बॉलिवूड आणि ओटीटीवर आपली छाप सोडत आहे. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकरची भूमिका असलेला भक्षक चित्रपट  नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. त्यानंतर आता  'डब्बा कार्टेल' या वेब सीरिजमध्येही ती झळकणार आहे. आता सई ताम्हणकर इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आणि प्रतिक गांधीसोबत (Pratik Gandhi) झळकणार आहे.अॅमेझॉन प्राईमवर सईचे हे दोन नवीन प्रोजेक्ट रिलीज होणार आहे.  इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत ती 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये ती झळकणार आहे. या चित्रपटात सईची काय भूमिका असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  (हेही वाचा - Disha Patani Hot Pics: दिशा पटानीने पांढरा गाऊन घालून चाहत्यांना केले थक्क, पाहा फोटो)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

सई तिच्या आगामी प्रोजेक्ट मधल्या खास सह-कलाकारांबद्दल सई म्हणाली की, "इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी या दोघांची स्तुती करावी तेवढीच कमी आहे. दोघांच्या सोबतीने काम करण्याचा अनुभव खूप शिकवून जाणारा होता. इमरान आणि प्रतीक हे अप्रतिम अभिनेते आहेत. आम्ही सोबत काम करतोय आणि आता हे काम कधी एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत.

या  वर्षाच्या अखेर नेटफ्लिक्सवर 'डब्बा कार्टेल'ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या  सीरिजमध्ये शबाना आझमी, ज्योतिका, शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता हे कलाकार असणार आहे.  'डब्बा कार्टेल' सोबतीने " ग्राउंड झिरो " आणि " अग्नी " हे सगळेच प्रोजेक्ट्स माझ्या करिअरचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे सईने सांगितले.