रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजा यांनी 'तुझे मेरी कसम' या त्यांच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमांच्या आठवणींना दिला उजाळा; टायटल ट्रॅक वर पुन्हा थिरकले (Watch Video)
Genelia D'souza and Riteish Deshmukh (Photo Credits: Twitter)

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूजा (Genelia D'Souza) यांच्यासाठी 'तुझे मेरी कसम' (Tujhe Meri Kasam) हा सिनेमा खास होता. या सिनेमाच्या माध्यमातून दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 2003 साली प्रदर्शित झालेल्या या रोमॅन्टिक सिनेमाला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहे. हे सेलिब्रेशन या जोडीने आज हटके पद्धतीने साजरं केलं आहे. दरम्यान या दोघांनीही या सिनेमाचं टायटल ट्रॅकवर पुन्हा थिरकत नव्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान सोशल मीडियावरही या दोघांनी गाण्याचा सुपर क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. बॉलिवूडमधील मराठमोळी जोडी रितेश-जेनेलिया देशमुख यांच्या पहिल्या चित्रपटाला झाली 17 वर्ष पूर्ण; शेअर केला रोमँटिक TikTok व्हिडिओ.

रितेश देशमुख ट्रॅक्टरवर पुढच्या बाजूला उभा राहून गाण्यावर लिप सिंग करताना दिसत होता. तर त्याला जेनिलियाचीदेखील साथ मिळाली आहे. 23 सेकंदाच्या या सुपरक्युट व्हिडिओला शेअर करताना, 17 वर्ष ... पण तरीही कालची गोष्ट वाटावी. पदार्पणाच्या सिनेमाच्या आठवणी! असं कॅप्शन देत रितेशने व्हिडिओ शेअर केला आहे.

'तुझे मेरी कसम' हा सिनेमा रितेश आणि जेनिलियाचा बॉलिवूड पदार्पणाचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमापासून त्यांची लव्हस्टोरी देखील सुरू झाली. आजही लातूरमध्ये मागील 17 वर्ष 'तुझे मेरी कसम' सिनेमा सिनेमागृहात दाखवला जातो. मुलांसह रितेश देशमुख घालतोय 'बाला बाला' या गाण्यावर धिंगाणा, पाहा संपूर्ण व्हिडिओ.

रितेश देशमुखचा व्हिडिओ

रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुझा 2012 साली विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात राहिल आणि रायन हे दोन चिमुकले आले. आता रितेश देशमुख बॉलिवूड सोबतच मराठी सिनेमामध्ये अभिनेता, निर्माता म्हणून कम करतो.