Rhea Chakraborty Arrested by NCB: रिया चक्रवर्ती हिला NCB ने केली अटक, ड्रग्ज प्रकरणाबाबत केली जाणार चौकशी
रिया चक्रवर्ती (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी वादाच्या भोव-यात अडकलेली रिया चक्रवर्तीला आज NCB कडून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणाचा रिया चक्रवर्तीशी संबंध असल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. सलग 3 दिवस NCB कडून चौकशी केल्यानंतर तिला आज अटक करण्यात आली आहे. काही कागदपत्रांची औपचारिकता बाकी असून लवकरच तिला ताब्यात घेतले जाईल.  TV9 ने दिलेल्या माहितीनुसार, आज तिची आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून रियाची NCB कडून चौकशी सुरु होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी NCB (Narcotics Control Bureau) च्या टीमने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी छापे टाकले. त्यानंतर रियाचा भाऊ आणि सुशांतचा मॅनेजर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान रियाच्या वडीलांनी एक स्टेटमेंट जारी केले आहे. त्यात त्यांनी मुलगा शोविक याच्या अटकेनंतर देशाचे अभिनंदन केले आहे. आता पुढील अटक माझ्या मुलीची होईल. तुम्ही मध्यम वर्गीय कुटुंबाला उद्धवस्त केल्याचे म्हटले आहे, असे म्हटले होते. Sushant Singh Rajput Case: शौविक च्या अटकेने संतप्त झालेल्या वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांनी सोडले मौन, म्हणाले- तुम्ही एका मध्यमवर्गीय कुटूंबाला उद्ध्वस्त केलात

तर रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी “जर एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल, तर तिला तिच्या प्रेमाचे परिणाम भोगावे लागतील. निर्दोष असल्याने, तिने बिहार पोलिसांसह सीबीआय, ईडी आणि एनसीबीने दाखल केलेल्या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नाही” असे म्हणाले होते.