Sushant Singh Rajput Case: शौविक च्या अटकेने संतप्त झालेल्या वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांनी सोडले मौन, म्हणाले- तुम्ही एका मध्यमवर्गीय कुटूंबाला उद्ध्वस्त केलात
Rhea Chakraborty Family (Photo Credits: Twitter)

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput Case) संशयास्पद मृत्यूप्रकरणी समोर आलेले ड्रग्ज प्रकरणाबाबत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) तपास केला आहे. ज्यामुळे या एजन्सीने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) याला अटक केली आहे आहे. त्याच्यासोबतच सुशांतच्या घरचे मॅनेजर सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) याला देखील अटक केली आहे. त्यानंतर कोर्टाने या दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर शौविक आणि रियाचे चे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती (Indrajit Chakraborty) खूपच नाराज झाले असून त्यांनी यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिले आहे. तुम्ही लोकांनी एका मध्यमवर्गीय कुटूंबाला उद्ध्वस्त केले आहे असे त्यांनी म्हले आहे.

इंद्रजीत यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, 'अभिनंदन इंडिया, तुम्ही माझ्या मुलाला अटक केलीत. मला खात्री आहे की, पुढील अटक माझ्या मुलीची रियाची असेल. तुम्ही अगदी यशस्वीपणे एका मध्यमवर्गीय कुटूंबाला उद्ध्वस्त केले. न्यायासाठी सगळं करणे योग्य आहे.' Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती हिला NCB कडून समन्स; आज चौकशी होणार

दरम्यान रिया चक्रवर्तीला आज त्याच्या भावासोबत बसवून चौकशी केली जाईल. मागील काही दिवसांपासून रियाची मुंबई पोलिस, ED, सीबीआय आणि NCB चौकशी करत आहेत.

शनिवारी सुशांत सिंह राजपूत याचे घरकाम करणा-या दीपेश सावंत याला देखील NCB ने अटक केली आहे.