रिया चक्रवर्ती (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा सध्या ड्रग्सच्या अनुषंगाने तपास सुरु आहे. आज सकाळी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्या घरी Narcotics Control Bureau ची टीम दाखल झाली होती. रियाला समन्स बजावण्यात आला असून आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच NCB कडून रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) याला अटक करण्यात आली असून त्यांना 9 सप्टेंबर पर्यंत NCB कोठडी सुनवण्यात आली आहे. दरम्यान आज रिया चक्रवर्ती हिला समन्स बजावण्यात आला असून तिची NCB कडून चौकशी होणार आहे. रिपोर्ट्सनुसार आज सकाळी 10.30 वाजता NCB च्या कार्यालयात रियाला हजर राहण्यास सांगितले आहे. शोविक, सॅम्युअल आणि रिया यांची एकत्रित चौकशी केली जाईल.

दरम्यान रियाला NCB टीमने चौकशीसाठी सोबत येण्यास सांगितले होते. मात्र रियाने थोडा वेळ मागून घेतला असून स्वतःहून कार्यालयात पोहचेन, असे सांगतिले. NCB चे सहसंचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, "रियाला समन्स देण्यात आला आहे. समन्स देण्याच्या वेळेस ती तिच्या घरी होती. चौकशीसाठी ती एकटी किंवा तिच्या टीमसोबतही येऊ शकते."  (बॉलिवूड मधील ड्रग्जचे गुढ उघकीस आणण्यास शौविक चक्रवर्ती करु शकतो मदत: एनसीबी)

ANI Tweet:

दरम्यान काल NCB (Narcotics Control Bureau) च्या टीमने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती  आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी छापे टाकले. त्यानंतर रियाचा भाऊ आणि सुशांतचा मॅनेजर यांना  चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान रियाच्या वडीलांनी एक स्टेटमेंट जारी केले आहे. त्यात त्यांनी मुलगा शोविक याच्या अटकेनंतर देशाचे अभिनंदन केले आहे. आता पुढील अटक माझ्या मुलीची होईल. तुम्ही मध्यम वर्गीय कुटुंबाला उद्धवस्त केल्याचे म्हटले आहे, असे म्हटले आहे.