Bharti Singh, Farah Khan, Raveena Tandon (Photo Credits: Instagram)

सध्या बॉलीवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती आहे. मात्र असे अनेक ऐतिहासिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत. आता असेच बॉलिवूड दिग्दर्शक फराह खान, कॉमेडियन भारती सिंग आणि अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon, Farah Khan, Bharti Singh) यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या तीनही सेलेब्जविरूद्ध पंजाबच्या अमृतसरमध्ये तक्रार दाखल केली गेली आहे. फराह, भारती आणि रवीना यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

एका खासगी वेब आणि यूट्यूब वाहिनीसाठी तयार केलेल्या विनोदी कार्यक्रमात ख्रिश्चन या शब्दाचा वापर केला गेला होता. कार्यक्रमात ज्या पद्धतीने हा शब्द वापरला ते म्हणजे थेट धर्माचा अपमान आहे असा विचार करून ही एफआयआर दाखल केली गेली आहे.

ख्रिसमसच्या दिवशीच हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या घटनेविरुद्ध ख्रिश्चन धर्माशी संबंधित लोकांच्या वतीने ख्रिसमसच्या दिवशी अजनाला येथे निषेध नोंदविला. त्यानंतर पंजाब पोलिसांनी तो व्हिडिओ तपासून एफआयआर नोंदविला आहे. या तीनही सेलेब्जविरूद्ध हा गुन्हा अमृतसरच्या अजनाला येथे दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी IPC धारा 295-Aअन्वये हा गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआर काल म्हणजे, 25 डिसेंबर रोजी रात्री 8:55 वाजता नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी पोलिसांना लेखी तक्रार देण्यात आली होती. सुरुवातीच्या तपासणीनंतर पोलिसांनी तक्रारीवरून एफआयआर नोंदविला. अजूनतरी या प्रकरणा बाबत पुढील कारवाईची माहिती मिळाली नसली तरी, धार्मिक भावना भडकवल्यामुळे या अभिनेत्रीच्या अडचणी वाढू शकतात. याबाबतीत अजूनतरी या तीनही सेलेब्जकडून काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही.