रणवीर सिंह याचा अंतरंगी लूक पाहून चाहत्यांनी दीपिका पादुकोण ला उद्देशून दिल्या अशा मजेशीर कमेंट्स, नक्की वाचा
Ranveer Singh (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा बाजीराव, अल्लाउद्दीन खिल्जी फेम अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) जेवढा त्याच्या अभिनयाने चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला तितकाच त्याच्या अंतरंगी वेशभूषेमुळेही. त्याच्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे तो अनेकांच्या चर्चेचा विषय बनत चालला आहे. काही लोक त्याचे या ड्रेसिंग स्टाईलचे कौतुक करतात तर काही त्याची वेड्यात काढतात. असो. नुकताच त्याने आपल्या पोलका डॉट शर्टमधील एक अंतरंगी लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोचे अनेकांनी कौतुक केले आहे तर काहींनी चक्क रणवीरला त्याची पत्नी दिपिका पादुकोण (Deepika Padukone) असल्याचे संबोधून ट्रोल केले आहे.

या फोटोमध्ये रणवीर सिंह ने काळ्या रंगाचे पोलका डॉट शर्ट घातले असून खाली रंगीबेरंगी पट्ट्यांची पँट घातली आहे. पाहा फोटोज

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

हेदेखील वाचा- चाहत्याने रणवीर सिंह ला 'I Love You' म्हटल्याने पत्नी दीपिका पादुकोणने पतीवर लावला चोरीचा आळ; पाहा गमतीशीर व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

हे फोटो पाहून नेटक-यांनी चक्क आम्हाला तू आधी दीपिकाच वाटला असं कमेंट दिले आहे. असो रणवीर ने काहीही कपडे घातले तरी अनेक तरुणींच्या गळ्यातला तो ताईत आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेक तरुण-तरुणी नेहमी प्रयत्नात असतात.

लवकरच रणवीर सिंह कबीर सिंह दिग्दर्शित '83' प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांच्यावर आधारित आहे.