चाहत्याने रणवीर सिंह ला 'I Love You' पत्नी दीपिका पादुकोणने पतीवर लावला चोरीचा आळ; पाहा गमतीशीर व्हिडिओ
Deepika padukone And Ranveer Singh (Photo Credit:Instagram)

बॉलिवूडमध्ये सध्याची हॉट आणि क्युट जोडी म्हणजे रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone). यांच्या अफेअरपासून ते यांच्या लग्नापर्यंतच्या चर्चा जितक्या रंगल्या तितक्याच चर्चा यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्याही रंगल्या. रणवीर-दीपिका आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भारतातील तिरुपती बालाजी,सुवर्ण मंदिर या देवस्थळांना भेट दिली आणि बॉलिवूडमधील ही क्युट जोडी जिथे सार्वजनिक ठिकाणी जाणार म्हणजे चाहत्यांची गर्दी ही होणारच हे वेगळं सांगायच गरज नाही. मात्र जेव्हा हे दोघे सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेले त्यावेळी त्यांच्यासोबत चाहत्याचा एक गमतीशीर किस्सा घडला.

लग्नाच्या वाढदिवशी दीप-वीर सुवर्ण मंदिरात गेल्यावर त्यांना पाहण्यासाठी असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती. प्रत्येक जण दीप-वीरसोबत बोलता यावं, त्यांची भेट घेता यावी यासाठी प्रयत्न करत होते. यामध्ये एक चाहती रणवीरला आय लव्ह यू म्हणाली. त्यानंतर दीपिका रणवीरकडे पाहून जे म्हणाली ते पाहून सारेच जण हसले. पाहा काय म्हणाली दीपिका...

हेदेखील वाचा- प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण नंतर आता आलिया भट सुद्धा हॉलीवूड वारीच्या तयारीत? वाचा सविस्तर

चाहत्यांच्या गर्दीमध्ये दीप-वीरची एक चाहतीदेखील आली होती. दीपिकाला पाहिल्यानंतर ती पटकन आय लव्ह यू मॅडम असं म्हणाली. त्यावर दीपिकानेदेखील तिला याचा रिप्लाय केला. मात्र थोड्याच वेळात या चाहतीने रणवीरलादेखील आय लव्ह यू म्हटलं. विशेष म्हणजे यावर दीपिकानेदेखील हसत हसत ‘माझे चाहते हिसकावून घेऊ नकोस’, असं म्हटलं. त्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकला.

सध्या दीपिका तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. लवकरच तिचा ‘छपाक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त ती ’83’ या चित्रपटातही झळकणार आहे.