प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण नंतर आता आलिया भट सुद्धा हॉलीवूड वारीच्या तयारीत? वाचा सविस्तर
Priyanka Chopra, Deepika Padukone, Alia Bhatt | (Instagram)

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण नंतर आता आलिया भटही हॉलीवूडवारी करायच्या तयारीत आहे. सध्या अमेरिकेत फिरत असलेली आलिया आपल्या एजन्टच्या मार्फत अनेक निर्मात्यांशी संपर्क साधून काम मिळवण्याच्या तयारीत आहे.

सर्वात आधी ऐश्वर्या रायने हॉलीवूड चित्रपटात भूमिका साकारून भारतीय अभिनेत्रींना विश्वपटलावर नेऊन ठेवले. प्रियांका चोप्राने काही वर्षांपूर्वी आलेल्या 'क्वान्टीको' या मालिकेद्वारे हॉलीवूड मध्ये पदार्पण केले. ती मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि भारतीय अभिनेत्यांचा आणि अभिनेत्रीना अजून एक माध्यम खुलं झालं. ते म्हणजे हॉलीवूड. दुसरीकडे अनिल कपूर, अनुपम खेर, ओम पुरी किंवा अगदी आत्ताच्या काळातला अली जफर ही मंडळी सहाय्यक भूमिका साकारत होतीच. पण प्रियांकाच्या धमाकेदार एन्ट्रीमुळे मुख्य भूमिकेसाठी सुद्धा भारतीय कलाकारांचा विचार केला जाऊ लागला. (हेही वाचा. Karan Johar ने काढलं भात्यातील 'ब्रह्मास्त्र'; Shahrukh Khan करणार Ranbeer-Alia सोबत काम)

दिशा पटाणी, अमायरा दस्तूर यांनी 'कुंग फु योगा' मध्ये जॅकी चॅन सोबत काम केले. तर दुसरीकडे 'फास्ट अँड फ्युरियस'च्या एका भागासाठी दीपिकाला विचारणा करण्यात आली होती. पण ती भूमिका नाकारल्यानंतर थोडेच दिवसात तिने 'ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ झेंडर इज' मध्ये विन डिझेलसोबत मुख्य भूमिका साकारली होती. आता आलिया कुठल्या प्रकारच्या भूमिका करते आणि कोणते चित्रपट निवडते की वेब सिरीजमध्ये काम करते हे बघावं लागेल.