करण जोहर याच्या पार्टीत रणबीर कपूर, दीपिका पादुकोण आणि मलायका अरोरा यांच्यासह अन्य कलाकारांनी ड्रग्ज घेतले होते? मिलिंद देवरा यांनी दिले स्पष्टीकरण
File image of Milind Deora (Photo Credits: PTI)

गेल्या आठवड्यात चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) याच्या घरी एका पार्टीचे आयोजन ठेवण्यात आले होते. त्यावेळी बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती दिसून आली. या पार्टीमध्ये रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर यांच्यासह अन्य कलाकार सहभागी झाले होते. परंतु करणच्या या पार्टीमध्ये ड्रग्ज घेतल्याचा संशय नेटकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

यावरुन भाजपच्या एका आमदाराने हा मुद्दा उचलून धरल्याने प्रकरण अधिक वाढले. तर अकाली दलामधील मनजिंदर सिंह सिरसा यांनी करण जोहरच्या पार्टीत ड्रग्जचा वापर करण्यात आल्याचे म्हटले. परंतु काँग्रेस नेता मिलिंद देवरा यांनी या प्रकारावर ट्वीट करत असे म्हटले आहे की, करणच्या पार्टीत माझी बायकोसुद्धा गेली होती. परंतु त्यावेळी कोणीच नशा केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर खोट्या बातम्य पसरवणे किंवा दुसऱ्यांना बदनाम करण्यास दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करणे बंद करा असे आवाहन केले आहे.(दिग्दर्शक अनुराग कश्यप याला सोशल मीडियात जीवे मारण्याची धमकी)

करणच्या पार्टीमध्ये दिसलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये विकी कौशल जमिनीवर बसला असून कॅमेरा त्याच्यासमोर आला तेव्हा तो नाक पुसत असल्याचे दिसुन आला.

विकी कौशल (फोटो सौजन्य-ट्वीटर)

सोशल मीडियात कलाकारांबद्दल संतापासह मिम्सचा व्हायर होत आहेत. तर विकी कौशलच्या बाजूला दिसलेल्या सफेद पावडर वरुन विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर काही युजर्सनी मुंबई पोलिसांना याबद्दल ट्वीटरवर टॅग करत कारवाई करावी असे म्हटले आहे.