Anurag Kashyap (Photo Credits-Twitter)

देशात वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत विविध क्षेत्रातील जवळजवळ 49 मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एक पत्र लिहिले आहे. तर मोदी यांना लिहिण्यात आलेले पत्र या मंडळींनी सोशल मीडियातसुद्धा पोस्ट केले आहे. या प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनीसुद्धा आपला सहभाग दर्शवला आहे. मात्र पत्र सोशल मीडियात पोस्ट केल्याने अनुराग कश्यप वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

तर अनुरागने पत्र ट्वीट केल्यानंतर एका व्यक्तीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्या व्यक्तीने असे म्हटले आहे की, माझ्याजवळील रायफल आणि शॉटगन साफ करुन ठेवली आहे. फक्त आता अनुराग आणि मी कधी समोरासमोर येणार याची वाटत पाहत आहे.

(मॉब लिंचिंग विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या 49 बॉलिवूड सेलिब्रिटींना 61 सेलिब्रिटींकडून प्रतित्तुर)

या प्रकारानंतर अनुरागने ते ट्वीट मुंबई पोलिसांना फॉरवर्ड केले आहे. पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेला या व्यक्तीच्या अकाउंटची माहिती देण्यात आली आहे. मात्र तरीही तुम्ही नजीकच्या पोलिस स्थानकात याबद्दल तक्रार करावी असे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या उत्तराबद्दल अनुरागने त्यांचे आभार मानले आहेत.