Rakhi Sawant (Photo Credits-Instagram)

देशभरातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन (CAA)  संमिश्र प्रतिक्रया समोर येत आहेत, कोलकत्ता (Kolkata) , महाराष्ट्रा (Maharashtra) सहित काही भागात या कायद्याच्या समर्थनार्थ तर राजधानी दिल्ली (Delhi)  येथून निषेधार्थ मोर्चे काढून प्रत्येकजण या निर्णयावर आपले मत मांडत आहे. या चर्चांमध्ये बॉलिवूड कलाकार मंडळी सुद्धा अनेक स्तरावरून सक्रिय सहभाग दर्शवत आहेत, अलीकडेच सोशल मीडियावर रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांना देखील आपण मत मांडताना पहिले असेल. या सगळ्यात सोशल मीडियाची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) हिने आता आपले मत दिले आहे. खरतर याबाबत शब्दांच्या ऐवजी राखीचे अश्रूच मत मांडून गेले आहेत. इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत यामध्ये राखी सावंत हिने CAA वर भाष्य केले, भाष्य नव्हे तर यात राखी ढसाढसा रडताना जास्त दिसून आहे.

राखीने रडत 'भारत आपला देश आहे, कृपा करून हिंदू- मुस्लिम वादात त्याला वाटून टाकू नका अशी विनंती नागरिकांना केली आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तिच्या या व्हिडिओवर सोफिया हयात हिने प्रतिक्रिया देत हिंदू मुस्लिम हे बांधव आहेत आणि बाकी सर्व फालतू राजकारण अशी कमेंट केली आहे.

राखी सावंत Instagram Post 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

दरम्यान, 'सीएए', 'एनआरसी' हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावरून विरोधकांचा समाचार घेतला. नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत असून या देशातील मुस्लिमांना डिटेंशन कॅम्प मध्ये पाठवले जाईल असे खोटे पसरवण्यात येत आहे असे पंतप्रधान मोदी यांनी काल सांगितले आहे.