CAA Protest: आमच्या पंतप्रधानाला केवळ नाटकी भाषण करता येते; अनुराग कश्यप याचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल
Anurag Kashyap And Narendra Modi (Photo Credits: ANI, PTI)

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात देशभरात अनेक ठिकाणी तीव्र निषेध केला जात आहे अनेक कलाकार मंडळींनी देखील या वादात सहभागी होत सरकारच्या या नव्या निर्णयाला विरोध केला होता.अलीकडेच रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांच्या ट्विटमुळे हा मुदा चर्चेत असताना आता दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टार्गेट करत एक वादग्रस्त ट्विट केले आहे.आमचा पंतप्रधान, प्रधानसेवक हा मुका बहिरा आहे त्याला जनतेच्या समस्या ऐकू येत नाहीत आणि त्यावर बोलतही येत नाही मात्र असं असतानाही नाटकी भाषणे देणे हे एकमेव काम केले जाते अशा कठोर शब्दात अनुराग यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्याकडे इशारा असणाऱ्या या ट्विट मध्ये कुठेही मोदींचे नाव घेतले नसले तरी अनेक खोचक विधाने केली गेली आहेत. हल्ली आमच्या पंतप्रधानानं नव्या नव्या खोट्या गोष्टी शिकण्यात वेळ घालवायचा आहे, नागरिकत्व सुधारणा कायद्याचा जो कोणी विरोध करत आहे तो गद्दार असल्याचे सांगत दडपशाचे सुरु आहे, आणि जर का आपल्या संविधानासाठी लढणं, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं आणि सरकारचा विरोध करणं हे जर गद्दारी असेल तर गद्दारचं म्हणा. परंतु माझी गद्दारी ही तुमच्या मोदी भक्तीपेक्षा मोठी देशभक्ती आहे, असंही अनुराग याने ट्विट मध्ये म्हंटले आहे.

अनुराग कश्यप ट्विट

या पाठोपाठ एकावर एक ट्विटची मालिका सुरु ठेवत अनुराग याने मोदींवर टीकास्त्र सोडली, रस्त्यावर विरोध करायला उतरलेले देशद्रोही नसून जे सत्तेत बसले आहेत, ते देशद्रोही आहेत. देश देशातील जनतेमुळे आणि संविधानामुळे आहे. तो सत्ताधाऱ्यांमुळे नाही. मोदी आणि शाह सत्तेत नव्हते तेव्हाही आपला देश होता आणि पुढेही राहील. परंतु भाजपाचा देशद्रोह यापुढे सहन केला जाणार नाही. देशभक्ती आता भाजपाला सिद्ध करावी लागले, आम्हाला नाही, असंही तो पुढील ट्विट मध्ये म्हणाला.

अनुराग कश्यप ट्विट

दरम्यान, अनेक स्तरावरून या निर्णयाला विरोध होत असताना तीव्र आंदोलने केली जात असताना सुद्धा मोदी सरकार आपल्या निर्णयाची अंमलबजावणी होणारच असा ठाम विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत. अलीकडे एका भाषणात मोदींनी आपल्यावरील टीकांमुळे त्रास होतो वाईट वाटते अशी खंत व्यक्त केली होती मात्र देशासाठी असेही ऐकायला लागते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.