'या' फोटोमुळे बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा झाली ट्रोल
Radhika Apte. (Picture Credits: Official Facebook Account)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) अनेक देशांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आला. त्यामुळे या काळात बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) लंडनमध्ये (London) तिच्या नवऱ्याच्या घरी गेली आहे. याकाळात ती सोशल मीडियावर सक्रीय असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. तिचे प्रत्येक अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. राधिका ही गेल्या काही दिवसांपासून तिचा आगामी ‘अ कॉल टू स्पाय’ या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. नुकताच राधिकाने सोशल मीडियाच्या माध्यामातून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी याआधीही राधिकाला अनेकदा ट्रोल केले आहेत.

राधिका आपटे ही बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेत. सध्या राधिका आपल्या पतीसह लंडनमध्ये आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून ती लंडनलाच आहे. राधिकाने लंडनमधील एका प्रसिद्ध भारतीय रेस्ट्रॉरंटमधील एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती शेफ सुरेंद्र मोहन यांच्यासोबत दिसून येत आहे. परंतु, या फोटोमध्ये राधिका आणि शेफ या दोघांनीही मास्क लावलेला नाही. तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालनही करताना दिसत नाही. त्यामुळे राधिकाला अनेकांनी ट्रोल केले आहे. हे देखील वाचा- BMC ने विनंती करूनही रेखा यांचा कोरोना विषाणू चाचणी करून घेण्यास नकार; बीएमसीच्या टीमला दिली ‘अशी’ वागणूक

राधिका आपटेची इन्स्टाग्राम पोस्ट-

कोरोनाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भर पडत चालली आहे. कोरोनावर अद्यापही कोणतीही लस किंवा तयार करण्यात आलेले नाही. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक देशाने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आणि मास्क लावणे बंधनकारक केले आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईदेखील केली जात आहे.