हाय स्लिट ड्रेसमध्ये प्रियंकाचा दिसला ग्लॅमरस लूक, पति निक जोनस सोबतचा शानदार फोटो सोशल मीडियात व्हायरल
प्रियंका चोपडा आणि निक जोनस (Photo Credits-Instagram)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा-जोनस (Priyanka Chopra-Jonas) हिने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. तिने आपल्या अभिनयातून सर्वांची मने जिंकली आहेत. तर सोशल मीडियात सुद्धा प्रियंका खुप अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येते. अलीकडच्या काही दिवसात प्रियंकाने पती निक जोनस सोबतचे फोटो सुद्धा शेअर करत आहे. अशातच आता तिने पुन्हा एकदा निक सोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये प्रियंकाला निक किस करताना दिसून येत आहे. तर लंडनमध्ये बराच काळ राहिल्यानंतर आता ती अमेरिकेत राहण्यासाठी आली आहे. प्रियंका हिने नुकत्याच लॉस एंजेसिल येथे आली आणि बिलबोर्ड्स म्युझिक अवॉर्ड्समध्ये तिची उपस्थिती दिसून आली.

निक सोबतचा फोटो शेअर करत प्रियंका हिने असे म्हटले आहे की, नवऱ्याची प्रशंसा करण्यासाठी पोस्ट लिहित आहे. मला तुझ्यावर गर्व आहे. तु जे काही करतो त्यावर ही गर्व आहे. तुझ्या कामाची पद्धत, प्रत्येक गोष्ट उत्कृष्टच करतो. तु मला नेहमीच प्रेरित करतो. आज तु शानदार काम केले आहे. आय लव्ह यू.(मुंबई पोलिसांनी Jacqueline Fernandez चे मानले आभार; अभिनेत्रींनी कोरोना साथीच्या काळात अभिनेत्रीने अशी केली मदत)

फोटोत तुम्हाला दिसून येईल की, प्रियंका हिने हाय स्लिट ड्रेस घातला असून त्यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तसेच निक सुद्धा अतिशय छान दिसतोय. या दोघांचे फोटो सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी सुद्धा त्यांच्या या फोटोंवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.