Jacqueline Fernandez (Photo Credit: Facebook)

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत बॉलिवूडचे अनेक कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. रूग्णांना उपचार आणि ऑक्सिजन प्रदान करण्यापर्यंत हे कलाकार मदत करत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही या दिवसात कोरोना विषाणूमुळे पीडित व्यक्तींना मदत करीत आहे. ती आता मुंबई पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे. जॅकलिन फर्नांडिसने रेनकोट व इतर सुरक्षाविषयक वस्तू देऊन पोलिसांना मदत केली आहे. याबद्दल मुंबई पोलिसांनी त्यांचे आभार मानले आहेत. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिस मुंबई पोलिसांना रेनकोट आणि इतर सुरक्षाविषयक वस्तू देताना दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'जसजसा जून जवळ येत आहे तसतसे मुंबई पावसाळ्याची तयारी करत आहे आणि म्हणूनचं आम्ही जॅकलिन फर्नांडिसने तिच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानले. हे आपल्या साथीसह पावसाळ्यात आपले संरक्षण करेल.' सोशल मीडियावर जॅकलिन फर्नांडिससाठी केलेले मुंबई पोलिसांचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (वाचा -Akshay Kumar ने Bell Bottom आणि Sooryavanshi चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत दिली 'ही' महत्त्वाची माहिती, वाचून चाहत्यांना बसेल धक्का)

अभिनेत्रीचे बरेच चाहते आणि बरेच सोशल मीडिया यूजर्स जॅकलिनचे कमेंट करून कौतुक करीत आहे. जॅकलिन फर्नांडिस कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, लोकांना सतत मदत करत आहे. नुकताचं तिने खुलासा केला आहे की, ती कोविड केअर सेंटरदेखील उघडणार आहे. याबद्दल स्पष्टीकरण देताना जॅकलिन फर्नांडिसने सांगितले की, आम्ही 100 बेड आणि 500 ​​ऑक्सिजन कंसंट्रेटर असलेले एक हॉस्पिटल उघडणार आहोत. या व्यतिरिक्त आम्ही दोन रुग्णवाहिका देखील खरेदी केल्या आहेत.

जॅकलिन फर्नांडिस यांनीही सांगितले की, आम्ही लोकांना मोफत रुग्णवाहिका सुविधा देणार आहोत. कारण रुग्णवाहिका सेवा खूपचं महाग आहे. लोक त्यांच्या सेवा घेऊ शकत नाहीत. यामुळे ते आपला जीव गमावत आहे. जर त्यांना वेळेवर रुग्णालयात नेले तर त्यांचा जीव वाचू शकेल. यामुळे आम्ही 2 रुग्णवाहिका विकत घेतल्या आहेत ज्या पूर्णपणे अत्याधुनिक असतील.