Akshay Kumar ने Bell Bottom आणि Sooryavanshi चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत दिली 'ही' महत्त्वाची माहिती, वाचून चाहत्यांना बसेल धक्का
Sooryvanshi and Bell Bottom (Photo Credits: Instagram)

कोरोनाची दुसरी लाट भारतात आल्याने प्रदर्शित होणारे हिंदी चित्रपट पुन्हा रखडले. यात खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट सूर्यवंशी (Sooryavanshi) आणि बेलबॉटम Bell Bottom) देखील रखडले गेले. त्यामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांमध्ये हे चित्रपट स्वातंत्र्य दिनादिवशी प्रदर्शित होणार अशी चर्चा रंगू लागली. या चर्चांना पूर्णविराम देत खिलाडी अक्षय कुमारने या चित्रपटांबाबात मोठे विधान केले आहे. अक्षयने केलेले विधान ऐकून चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Taran Adarsh) याने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने आपले आगामी चित्रपट बेल बॉटम आणि सूर्यवंशी संदर्भात एक पत्रक जाहीर केले आहे. ज्यात अक्षयने सांगितले आहे की, "सूर्यवंशी आणि बेलबॉटमला या चित्रपटांना घेऊन चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे याबाबत मी कृतज्ञ आहे. याबाबत मी सर्वांचे आभार मानतो. मात्र हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिना दिवशीच प्रदर्शित होतील याबाबत शाश्वती देता येत नाही."हेदेखील वाचा- Akshay Kumar पुढील महिन्यापासून पुन्हा सुरू करणार 'Ram Setu' चित्रपटाचे शुटिंग; फिल्मसिटीमध्ये तयार करण्यात आला गुफांचा सेट

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

तसेच "या दोन्ही चित्रपटांचे निर्माते या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखेवर काम करत आहेत. आणि योग्य वेळी याबाबत घोषणा केली जाईल." असेही अक्षयने यात म्हटले आहे.

दरम्यान, अक्षय कुमारच्या 'राम सेतु' या चित्रपटाचे शूटिंग येत्या जूनपासून पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाचे शूटिंग 4 जून ते 20 जून दरम्यान सुरू होऊ शकते. यासाठी निर्मात्यांनी एक विशेष योजना तयार केली आहे. निर्माते चित्रपटाच्या टीमसोबत सतत बैठक घेऊन प्लान सुरू ठेवण्याचा विचार करीत आहेत. चित्रपटाचे कलाकार आणि क्रू-मेंबर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेला रवाना होतील. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिज आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहेत.