प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) चे अनेक चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहेत. सध्या तो बहुप्रतिक्षित ‘राम सेतु’ (Ram Setu) या चित्रपटासाठी चर्चेत आहे. दरम्यान, अक्षय कुमार या चित्रपटाचे शूटिंग येत्या जूनपासून पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाचे शूटिंग 4 जून ते 20 जून दरम्यान सुरू होऊ शकते. यासाठी निर्मात्यांनी एक विशेष योजना तयार केली आहे. निर्माते चित्रपटाच्या टीमसोबत सतत बैठक घेऊन प्लान सुरू ठेवण्याचा विचार करीत आहेत. चित्रपटाचे कलाकार आणि क्रू-मेंबर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेला रवाना होतील. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिज आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहेत.
या अहवालात असेही म्हटले आहे की, निर्माते, दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन टीम सतत झूम कॉलवर आपले सादरीकरण करत अपडेट देत असतात. त्याचवेळी VFX टीमने फिल्म सिटीमध्ये गुफांचा एक सेट तयार केला आहे, ज्याद्वारे अक्षय 'राम सेतू' च्या ठिकाणी पोहोचताना दिसणार आहे. (वाचा - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉडीगार्डवर एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आणि फसवल्याचा आरोप, मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, 'राम सेतु' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर करण्यात येणार आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशच्या अयोध्या शहरात या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते, परंतु कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे ते पूर्णपणे थांबवावे लागले. याशिवाय सुपरस्टार अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. तथापि, जॅकलिन आणि नुसरतचा कोरोना अहवाल नकारात्मक असल्याचं समोर आलं होतं. अक्षय कुमारने कोरोनावर यशस्वी मात केली असून लवकरचं तो चित्रपटाच्या शुटिंगसाठी परतणार आहे.