Molestation| File Photo

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या बॉडीगार्डवर (Bodyguard) एका तरुणीने बलात्कार केल्याचा आणि लग्नाचे आमिष दाखवून 50,000 रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी डी एन पोलिस स्टेशनात (D N Nagar) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार आरोपीवर IPC 376 आणि 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यात अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही.

इंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी बॉडीगार्डने मुंबईतील एका महिला मेटअप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर तिची पैशांच्या बाबतीत फसवणूकही करण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Radhika Apte ने लीक झालेल्या Nude Video वर सोडले मौन, केला धक्कादायक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या मुंबईस्थित घरी वारंवार जायचा. त्यावेळी अनेकदा तिच्यावर जबरदस्ती करुन शारीरिक संबंध ठेवायचा. एकदा असाच तो तिच्या घरी आला असता त्याने पीडितेच्या घरातील 50 हजार रुपये घेऊन तेथून लंपास झाला. त्यानंतर पीडितेने अंधेरीच्या डी एन नगर पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.