बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) ही आपल्या फोटोज, व्हायरल व्हिडिओज तसेच वादग्रस्त सीन्समुळे बरीच चर्चेत असते. दरम्यान तिचा एक न्यूड व्हिडिओ (Nude Video) देखील व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 'क्लीन शेवन' (Clean Shevan) या चित्रपटातील आहे. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर राधिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले. याबाबत राधिकाने मौन सोडत मोठा खुलासा केला आहे. लीक झालेल्या व्हिडिओमधील महिला ती नसल्याचे राधिकाने सांगितले आहे.
दरम्यान राधिकाने 'Parched' हा सिनेमा देखील केला होता. हा सिनेमा राधिकाकडे त्यावेळी आला ज्यावेळी तिला या चित्रपटाची गरज होती. 2016 मध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ग्राजिया मासिकासोबत झालेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली होती की, "तुम्ही बॉलिवूडमध्ये काम करत असाल, तर तुम्हाला सातत्याने तुम्हाला तुमच्या शरीरासोबत काय करायचे आहे हे सांगितले जाते. मी सुद्धा या गोष्टीवर जोर दिला आहे. मी माझ्या शरीरासोबत आणि चेह-यासोबत काहीही करणार नाही."हेदेखील वाचा- Neha Kakkar ने भररस्त्यात पती Rohanpreet Singh च्या लगावली कानशीलात; जाणून घ्या काय आहे प्रकरण, पहा व्हायरल व्हिडिओ
View this post on Instagram
"जेव्हा माझा न्यूड व्हिडिओ लीक झाला, तेव्हा मी क्लीन शेवनची शूटिंग करत होती. तेव्हा मला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले. मी खूप दिवस घरातून सुद्धा बाहेर पडली नाही. हे त्यासाठी नाही की मिडिया काहीतरी बोलत होती, तर माझा वॉचमन, ड्रायवर आणि स्टायलिस्टचा ड्रायव्हरसुद्धा मला त्या फोटोवरुन ओळखू लागले होते."
राधिकाने पुढे असेही सांगितले होते की, "ते वादग्रस्त फोटोज नग्न अवस्थेत काढलेली सेल्फीज होती आणि समजूतदार माणूस सहज ओळखू शकेल की, ती मी नाही. पण मी काही करू शकत नव्हती. मात्र जेव्हा मी पार्श्च्ड मध्ये आपले कडे उतरवले तेव्हा मला जाणीव झाली की, आता माझ्याकडे लपविण्यासारखे काही उरलेच नाही."