Neha Kakkar slaps her husband Rohanpreet Singh (PC - Instagram)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) हिचा समावेश इंड्रस्ट्रीतील हिट गायकांच्या यादीत होतो. नेहा केवळ तिच्या गाण्यांबरोबरचं सोशल मीडियावरही अत्यंत अ‍ॅक्टिव्ह असते. गेल्या वर्षी नेहाने पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगशी (Rohanpreet Singh) लग्न केले. लग्नापासून हे दोघेही सतत चर्चेत असतात. दोघेही चाहत्यांसोबत त्यांच्या खास क्षणांची छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करतात. दरम्यान, आता नेहा आणि रोहनप्रीतचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नेहा कक्करने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा एक मजेदार व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ती रोहनप्रीतसोबत तिच्या नवीन संगीत व्हिडिओ 'खड़ तेनु मैं दस्सा' वर नाचताना दिसत आहे. हे गाणे काही काळापूर्वी रिलीज झाले आहे. या नवीन म्युझिक व्हिडिओमध्ये 'नेहूप्रीत' ची जोडी चांगलीचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता की, नेहा तिचा पती रोहनप्रीतबरोबर पोज करताना दिसत आहे. मग नेहा संतप्त झाली आणि तिने रोहनप्रीतला भररस्त्यात चापट मारली.

या व्हिडिओवर टिप्पणी देताना नेहाचा पती रोहनप्रीत यांनी लोकांना एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, 'मला सर्व लोकांना विचारायचे आहे की, प्रत्येक घरवाली तिच्या घरवाल्याला अशा प्रकारे मारते का? प्रत्येक घरवाल्याच्या नशीबात मारहाणचं लिहल्याली आहे का? व्हिडिओमध्ये या दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूपचं आवडला आहे. (वाचा - Salman Khan ने उपलब्ध केले मुंबईत 500 Oxygen Concentrators; गरजवंत इथे मागू शकतात मदत)

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

नेहा कक्कड़ने तिच्या इंस्टाग्रामवर 'खढ़ तैनू मैं दस्सा' गाण्याचा फर्स्ट लूक शेअर केला होता. या पोस्टरमध्ये नेहा कक्कर तिचा नवरा रोहनप्रीत सिंगसोबत दिसली होती. पोस्टरमध्ये नेहाने क्रॉप टॉपसह स्कर्ट परिधान केला होता. तर रोहनप्रीत सिंग कलर फुल प्रिंट केलेला शर्ट आणि ऑरेंज कलरच्या ट्राऊजरमध्ये दिसला होता.