Salman Khan ने उपलब्ध केले मुंबईत 500 Oxygen Concentrators; गरजवंत इथे मागू शकतात मदत
Salman Khan Arranges Oxygem Concentrators (Photo Credits: Instagram)

भारतात कोरोना वायरसची दुसरी लाट आली आणि देशाची आरोग्य यंत्रणा किती खिळखिळी झाली आहे याची अनेकांनी प्रचिती घेतली. भारतामध्ये या दुसर्‍या लाटेमध्ये अनेकांनी ऑक्सिजन, औषधोपचारांअभावी प्राण गमावले. देशात आता ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स पोहचवण्यासाठी देशा-परदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यामध्ये थोडा हातभार बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानचा देखील आहे. सलमान खानने (Salman Khan)  नुकतीच सोशल मीडियामध्ये पोस्ट करून 500 ऑक्सिजन कॉन्सटेटर्स (Oxygen Concentrators) उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली आहे. ही मदत त्याने बाबा सिद्धिकी आणि त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्धिकी च्या मार्फत आता गरजवंतासाठी खुली केली आहे.

सलमान खानने मुंबई मध्ये ऑक्सिजन कॉन्स्टटेटर्स आल्यानंतर गरजावंतांना जसे ते हवे असतील तसे पुरवले जातील असं म्हटलं आहे. ही मोफत सेवा असून ते ज्यांना हवे आहे त्यांनी 8451869785 क्रमांकावर संपर्क साधण्याचा, सलमान खानच्या सोशल मीडीया हॅन्डल्सवर मदत मागण्याचं आवाहन त्याने केले आहे. Salman Khan मुंबई मध्ये 5000 फ्रंटलाईन वर्कर्स साठी जेवणाची सोय पहायला स्वतः पोहचला ‘Bhaijaanz Kitchen’ मध्ये (Watch Video).

सलमान खान पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दरम्यान सलमान खानने पोस्ट करताच त्याच्या या उदारपणाचं चाहत्यांकडून कौतुक होण्यास सुरूवात झाली आहे. अनेक सामान्य चाहते, सेलिब्रिटीज यांनी सलमान खानचं अभिनंदन केले आहे. सलमान खानने कोविड संकटात मदतीचा हात पुढे करण्याची ही पहिली वेळ नव्हे. मागील वर्षी लॉकडाऊनची घोषणा होताच त्यने सिनेक्षेत्रात रोजंदारीवर काम करणार्‍या आर्थिक आणि अन्नधान्यांची मदत केली होती. यंदाही पोलिसांना नाकेबंदी दरम्यान सकस आहार मिळावा म्हणून फूड पॅकेज उपलब्ध करून दिली आहेत. काही दिवसांपूर्वी तो स्वतः पदार्थांची चव चाखायला आणि सोय कशी आहे हे पहायला रस्त्यावर उतरला होता.