पार्टीमध्ये निक जोनस-प्रियांका चोप्रा यांची धमाल मस्ती, चाहत्यांवर केक फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video)
प्रियांका चोप्रा (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

जोनस ब्रदर्स (Jonas Brothers) यांचे नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेले गाणे सकर (Sucker) ह्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून बिलबोर्ट हॉट 100 लिस्टमध्ये सहभागी झाले आहे. या यशानंतर निक जोनस (Nick Jonas) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) मियामी (Miami) येथे सुट्टीचा आनंद घेत आहेत. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामधील अजून एक फोटो समोर आला आहे. त्यामध्ये प्रियांका आणि निक चाहत्यांवर केक फेकतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

स्टीव अओकी (Steve Aoki) ह्याच्या कॉन्सर्टमध्ये प्रियांका आणि निक धमाल मस्ती करताना दिसून आले. त्यावेळी या दोघांनी चाहत्यांवर केक फेकत असल्याचे फोटो समोर आले आहेत. तर नुकताच प्रियांका सुट्टीचा आनंद घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये बॉलिवूडमधील हिट गाणे तारीफा वर डान्स करताना दिसून आली होती.(हेही वाचा-निक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

 

View this post on Instagram

 

Raise your 🙌 if you're ready for some 🎂!! @priyankachopra @jonasbrothers @nickjonas @joejonas @storymiami

A post shared by Steve Aoki (@steveaoki) on

प्रियांका लवकरच आता द स्काय इज पिंक मधून झळकणार आहे. यामध्ये प्रियांकासह फरहान अख्तर मुख्य भुमिकेत दिसणार असून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.