निक जोनस (Nick Jonas) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या मियामी (Miami) येथे सुट्टीचा आनंद घेत आहेत. तसेच या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायल होत असून प्रियांका हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे. या बिकनीमध्ये प्रियांका अतिशय सुंदर दिसून येत आहे.
या सुट्टीवेळी प्रियांका हिच्या सोबत अभिनेत्री सोफी टर्नरसुद्धा दिसून आली. प्रियांका आणि निक मियामी येथे घालवत असलेल्या सुट्टीसाठी अत्यंत खुश दिसून येत आहेत. तसेच सोशल मीडियावर प्रियांकाचा ब्लॅक बिकनीमधील हॉट लूक प्रचंड व्हायरल होत आहे.
तर प्रियांका लवकरच आता स्काय इज पिंक मधून झळकणार आहे. सोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट असून यामध्ये प्रियांकासह फरहान अख्तर आणि जायरा वासीम सुद्धा दिसून येणार आहे.