अभिनेता प्रभास आणि दीपिका पादुकोण ही जोडी प्रथमच ऑनस्क्रीन दिसणार एकत्र, आगामी Sci-Fi चित्रपटाची केली सर्वात मोठी घोषणा
Prabhas and Deepika Padukone (Photo Credits: Facebook)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिच्या छपाक चित्रपटानंतर तिचे असंख्य चाहते तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा कधी होणार याकडे कान लावून बसले होते. लवकरच ती रणवीर सिंह सह '83' या चित्रपटात दिसेल. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यातच तिच्या एका आगामी साय-फाय (Sci-Fi) सिनेमाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. याचे चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात दीपिका बाहुबली फेम 'प्रभास' (Prabhas) सोबत प्रथमच स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन ( Nag Ashwin) यांनी याबाबत घोषणा केली आहे. आज वैजयंती मूव्हिज (Vyjayanthi Movies)ट्विटरवर याची घोषणा करुन या नव्या जोडीला ते प्रथमच एकत्र आणणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत चित्रपटाबाबत आपला आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक अश्विन नाग यांनी सांगितले की, "मी दीपिकाला हे पात्र साकारताना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. हे अशा प्रकारचे पात्र आहे ज्याला आतापर्यंत कोणत्याही मेनस्ट्रीम केले नाही आहे. हे सर्वांसाठी एक मोठं सरप्राईज असेल" असेही ते पुढे म्हणाले.

त्यामुळे या चित्रपटाची उत्कंठा आणखीनच शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना प्रथमच दीपिका आणि प्रभास ही जोडी एकत्र पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. सध्या तरी या चित्रपटाच्या शीर्षकाविषयी आणि त्याच्या प्रदर्शनाविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.