Priyanka Nick Reception Party: प्रियंका-निक रिसेप्शन पार्टीला PM Modi उपस्थित राहण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी I प्रियंका-निक (Photo Credits: PTII/Yogen Shah)

Priyanka Nick Reception Party: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अमेरिकन गायक निक जोनस (Nick Jonas) यांचा शाही विवाहसोहळा नुकताच जोधपूर (Jodhpur) येथील उमेद भवन पॅलेसमध्ये (Umaid Bhawan Palace) पार पडला. आज या दोघांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी दिल्लीत रंगणार आहे. या रिसेप्शन पार्टीला हॉलिवूडचे (Hollywood) काही खास पाहुणे हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर सेलिब्रेटी आणि उद्योगपतींची मांदीयाळी रिपेप्शन पार्टीत पाहायला मिळेल.

रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिसेप्शनचे खास निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रँड रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी विरुष्का च्या रिसेप्शन पार्टीला पंतप्रधान मोदींनी उपस्थिती लावली होती.

प्रियंका चोप्रा निक जोनस (Photo Credits: Joseph Radhik)

1-2 डिसेंबरला प्रियंका-निक हिंदू, ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्यापूर्वी रंगलेल्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे खास फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.